¶ मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, “मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. इशाय बेथलहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण मी त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.”
TSK
TSK · 1 इति 11:2
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे.
इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणात्याही अधिकाऱ्याला “कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस?” असे विचारले नाही.
परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.
मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास तो चारील, तो कोकरास आपल्या बाहूत एकवटून त्यांना आपल्या उराशी धरून वाहील आणि तान्ह्या पिल्लांना पाजणाऱ्या मेंढ्याना तो जपून नेईल.
माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.
तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल.
‹आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.›