TSK

TSK · 2 इति 12:5

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील:

तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही.

शमाया नामक देवाच्या मनुष्याशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,

पण परमेश्वराचा मनुष्य शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला,

अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तो ही तुम्हास सोडेल.

परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.

तूझे मार्ग आणि तुझे कर्म यानी तुला या गोष्टी आणून दिल्या आहेत. ही तुझी दुष्टाई आहे, आणि ती कडू या कारणाने तुझ्या हृदयापर्यंत पोचली आहे.”

“जेव्हा हे लोक व संदेष्टे किंवा याजक तुला विचारतील की ‘परमेश्वराने काय घोषणा केली आहे?’ तेव्हा तू त्यांना सांग, कोणती घोषणा? कारण मी तुम्हास टाकले आहे, परमेश्वर असे म्हणतो.