स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. “त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले.” पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
TSK
TSK · 2 इति 29:10
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
“इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते.
यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.
राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरूशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली.
¶ एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले.
“तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.”
¶ आता तुम्ही स्वतः पश्चाताप केला होता आणि माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते करू लागला होता. तुम्ही प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याच्या मनुष्यास स्वातंत्र जाहीर केले. आणि ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यामध्ये तुम्ही माझ्यासमोर करार केला होता.
ते सियोनेची वाट विचारतील व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. ते जातील आणि म्हणतील जो कधी मोडला जाणार नाही अशा सर्वकाळच्या कराराने आपण स्वत: परमेश्वराशी जोडले जाऊ.