TSK

TSK · 2 इति 5:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांस पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत.

यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.

तो त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका! देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्रस्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका.

होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.

येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले.

वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत:चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.”