तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा.” मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.
TSK
TSK · 2 राजे 6:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला, “आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करून दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही.”
मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? ‘स्नान करून शुध्द हो,’ एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?”
¶ आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?”