¶ बलामाने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही. बालाकाने माझे घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
TSK
TSK · 2 पेत्र 2:15
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामास म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.
कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले.
एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही तर तुम्ही आणि तुमचे वडिल यांच्यामुळे ते उद्भवलेले आहे. कारण तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून बआल दैवतांच्या मागे लागलात.
या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.
म्हणून मी त्यांच्यावर दया दृष्टी करणार नाही. त्यांची दया करणार नाही. त्यावर त्यांच्या कृत्यांचे फळ त्यांच्या माथी देईन.”
माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा, त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत येऊन त्यास कसे उत्तर दिले, त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”
(त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली.
त्यांचे वाईट होईल ह्यात त्यांना त्यांच्या वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल. ते दिवसाच्या ख्यालीखुशालीत सुख मानतात; ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर ते जेवतात तेव्हा ते दंगली करून मजा करतात.
‹पण तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ काही गोष्टी आहेत कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व व्यभिचार करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले, त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.›