TSK

TSK · आमो 3:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

“परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?” असे इतर राष्ट्रांतील लोक विचारतील.

ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदीत होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल.

कृपाळू स्त्रीस आदर मिळतो, परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात.

कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा, कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!

तू पुन्हा शोमरोनाच्या डोंगरावर द्राक्षमळ्यांची लागवड करशील. शेतकरी लागवड करतील आणि त्याच्या फळांचा चांगला उपयोग होईल.

मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या. तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.

“पण इस्राएलाच्या पर्वतांनो, तुम्हावरील झाडास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांसाठी फळे द्याल असे लवकरच घडून येईल.

जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा एफ्राईमाचे पाप आणि शोमरोनाची अधमता उघड होते. ते कट रचतात, चोर आत शिरतो, आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.

शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.

तुम्ही जे वाईट दिवसास दूर करता, आणि हिंसाचाराचे आसन जवळ आणता, त्यांना हाय हाय.

अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.