तेव्हा इस्राएलाला सांग, मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हास त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन, आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन.
TSK
TSK · निर्ग 7:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल.
परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारो तुमचे ऐकणार नाही मी मिसर देशात पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्यात म्हणून असे होईल.”
परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत.
प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, माझा आत्मा माझ्यामध्ये आतुरतेने तुला शोधीन, कारण जेव्हा तुझा न्याय या पृथ्वीवर येतो, तेव्हा या जगातील राहणारे न्यायीपण शिकतात.
कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो.
मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन.
हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.
कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.