TSK

TSK · यहे 21:20

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.

यरूशलेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली.

या घटनेनंतर मनश्शेने दावीद नगराभोवती आणखी एक कोट बांधला. हा कोट गीहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता. यहूदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले.

जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.

यास्तव परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, अम्मोनाच्या लोकांस राब्बाविरूद्ध जेव्हा मी लढाईसाठी संकेताचा आवाज ऐकावयास लावीन, तेव्हा ते ओसाडीचा ढीग होईल आणि त्यांच्या कन्या अग्नीने जाळल्या जातील. कारण जे कोणी त्याच्या ताब्यात होते त्याचा ताबा इस्राएल घेईल.” असे परमेश्वर म्हणतो.

आणि मी राब्बाचे उंटासाठी कुरण करीन व अम्मोन लोकांच्या कळपासाठी शेत करीन. मग तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.