TSK

TSK · यहे 21:24

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील.

डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.

त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते लाजले का? त्यांना काही लाज वाटली नाही आणि त्यांनी पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. त्यांना कोणत्याही अपमानास्पद वागणूकीचा अनुभव घेतला नाही. यास्तव मी ज्यावेळी त्यांना शिक्षा करीन तेव्हा ते पडणाऱ्यांबरोबर पडतील. ते उध्वस्त केले जातील.” परमेश्वर असे म्हणतो.

जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.

मग तू आपले विविध रंगी कपड्यांनी उच्च स्थाने सजवली, कधी झाली नाही व कधी केली जाणार नाही असे वेश्या कर्म तू केलेस.

‘मानवाच्या मूला’ तिला सांग तू अशी भूमी आहेस जी अजून शुध्द झाली नाही, क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही.

बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, व कोआ येथील लोक व अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करीन.

तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.

तुम्ही सियोन रक्ताने आणि यरूशलेम अन्यायाने बांधले आहे.