मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली.
TSK
TSK · उत्प 12:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन.
तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
¶ अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.
ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.”
देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले.
या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.
तो तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्राहामाचे आशीर्वाद देवो, आणि जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो.”
म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “या ठिकाणी मी देवाला समक्ष पाहिले आहे, तरी माझा जीव वाचला आहे.”
त्याने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल-बेथेल” असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना याच जागी प्रथम देवाने त्यास दर्शन दिले होते.
योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हास या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”
ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे.
तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली, मोशेने पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.
त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते.
तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्यास सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
¶ मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;
तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे.
मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यर्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.
त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली.
तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस.
योसादाकाचा मुलगा येशूवा आणि त्याचे भाऊ याजक व शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि त्याचे भाऊ यांनी उठून इस्राएलाच्या देवाला होमार्पणे अर्पिण्यासाठी, देवाचा मनुष्य मोशे याच्या नियमशास्त्रात आज्ञापिल्याप्रमाणे वेदी बांधली.
तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुझा वतनभाग असा म्हणून देईन.”
म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
¶ आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.