TSK

TSK · उत्प 17:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.

ऊठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”

“मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.”

याकोब मग किर्याथ-आर्बा (म्हणजे हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे आला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते.

देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’

मी तुम्हास आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून काढून आणतो तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास समजेल.

इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.

त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”

¶ इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.

¶ मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”

¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानातील अबारीम डोंगरावर तू चढून जा. मी इस्राएल लोकांस जो देश देणार आहे तो तेथून पाहा.

कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने भुतलावरील सर्व राष्ट्रातून तुमची निवड केली आहे.

त्याद्वारे तो तुम्हास आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हास आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे.

“मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील.

“माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.

तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन.”

त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली.

मग मी ठरवेन तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. तर ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.

मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरूशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.”