TSK

TSK · उत्प 24:32

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा.

जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली, तेव्हा लाबान धावत जाऊन त्यास भेटला. त्यास मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्यास आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानाला सांगितल्या.

तेव्हा त्या मनुष्याने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यांनी आपले पाय धुऊन खाणेपिणे केले.

तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, ‹“ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले.›

जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.