माझा जीव वाचवून तू माझ्यावर मोठी दया दाखवली आहेस आणि तुझी कृपादृष्टी तुझ्या दासास प्राप्त झाली आहे, परंतु मी डोंगरापर्यंत पळून जाऊ शकणार नाही, कारण आपत्ती मला गाठेल व मी मरून जाईन.
TSK
TSK · उत्प 33:10
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परंतु यहूदा त्यास म्हणाला, “त्या देशाच्या अधिकाऱ्याने आम्हांला ताकीद दिली. तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकट्या भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर तुम्ही माझे तोंडदेखील पाहणार नाही.’
सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा,
¶ तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?”
यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलाची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलीस तरच मी तुला भेटीन.”
यरूशलेमेमध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दावीद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही.
तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
परमेश्वर असे म्हणतोः “मी इस्राएलास विसावा देण्यास येईन तेव्हा जे कोणी तलवारीपासून निभावले आहेत त्या लोकांस रानात अनुग्रह मिळेल.”
आणि ते त्याचे मुख पाहतील व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल.