TSK

TSK · उत्प 34:5

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्यास म्हणाला, “मी तयार आहे.”

¶ मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”

तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.”

अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.

‹यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला.›