मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली.
TSK
TSK · उत्प 4:26
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.
मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
¶ जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.
त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता आहे या नावाने बोलवतील.
त्यानंतर लोकांस मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी.
¶ तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.”
‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
¶ या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.