TSK

TSK · उत्प 46:19

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”

¶ मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.

¶ याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला.

मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हास माहीत आहे की, माझ्या पत्नीच्या पोटी मला दोन पुत्र झाले.

योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे. तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत.

इस्साखार, जबुलून, बन्यामीन;

¶ बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वरास प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील.”