तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वरास हाक मारून म्हटले, “तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंती लोकांच्या हाती पडत आहे.”
TSK
TSK · होशे 2:3
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
भूमी शोक करते आणि ती शुष्क झाली आहे; लबानोन निस्तेज झाला आहे आणि शुष्क झाला आहे; शारोन सपाट रानाप्रमाणे झाला आहे; आणि बाशान व कर्मेल आपली पाने गाळीत आहेत.
तुझी पवित्र नगरे वाळवंटाप्रमाणे बनली आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमेचा नाश झाला आहे.
जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?
पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे, त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे.
यरूशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल.
कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की, गिलादाप्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल.
तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही
तुझे सर्व किळसवाणे व वेश्याकर्म तू कुमारी असतांना नग्न होऊन रक्तात लोळत होती याचे स्मरण तुला झाले नाही.
मग तिला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहान आहे.
¶ ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिनेही घेऊन जातील.
परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन, ते दिवस येतच आहेत, तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल, पाण्याचा दुष्काळ नसेल, परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”