TSK

TSK · होशे 9:2

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

म्हणून मी हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.

मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, ज्या विषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.

परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत. परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.

तुम्ही गरिबांना तुडवीता, आणि त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली, पण त्यामध्ये तुम्ही रहाणार नाही. तुमच्या द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पिणार नाही.

“तुम्ही पुष्कळाची वाट पाहिली, परंतु पाहा! तुम्ही थोडके घरी आणले तेव्हा मी त्यावर फुंकर मारली! हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो! कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक मनुष्य आपआपल्या स्वत:च्या घरात आनंद घेत आहे.