TSK

TSK · यश 28:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.”

एफ्राईमा मी तुला काय करु? यहूदा मी तुला काय करु? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.

एफ्राईम रोगी आहे त्यांचे मूळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही, त्यांना जरी मुले झाली तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन.

एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.

¶ तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होतील. जर ते हालविले, तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.

अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले