TSK

TSK · यश 28:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.

हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.

माझ्या लोकांनो; लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात, व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळात टाकतात.

जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय!

नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.

परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे.

तुम्हास सर्व दर्शन शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाच्या शब्दाप्रमाणे झाले आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्यास वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे.”

ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.”

“शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बाल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले. आणि त्यांनी इस्राएलाच्या लोकांस चूकीच्या मार्गास नेले.

त्याने शत्रूंप्रमाणे आमच्या दिशेने आपला धनुष्य वाकविला आहे. त्याने युद्धासमान संघर्षाचा पवित्र घेऊन शत्रूप्रमाणे आम्हावर बाण चालविण्यास आपल्या हाताने नेम धरिला आहे. त्याच्या दृष्टीस बहूमूल्य लोकांची त्याने हत्या केली. सियोनकन्येच्या तंबूवर त्याने आपला क्रोध अग्नीसारखा ओतला आहे.

आतल्या अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षरस पिऊ नये.

राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले; मग त्याने आपला हात थट्टा करणाऱ्यांच्या हाती दिला.

¶ ‹सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.›

याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो.