TSK

TSK · यश 3:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामाच्या राजाच्या हातून आहाजाचा पराभव करविला. अरामाच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजाचा पाडाव करून यहूदाच्या लोकांस कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजाचा पराभव करवला.

बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या पुत्रांचा यज्ञात बली दिला. जादूटोणा, चेटूक यातही तो पारंगत होता. चेटूक करणारे आणि मृतात्म्याशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते. परमेश्वराने निषिध्द मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली. त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला.

¶ तेव्हा खास्दी राजाला देवाने यहूदा व यरूशलेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरूशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांस जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सराला यहूदा व यरूशलेमेच्या लोकांस शासन करायची मुभा दिली होती.

जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल, आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.

जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय!

तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता? कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता? तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय?

पण तुम्ही कधीही परमेश्वराच्या ओझ्याची आठवण करुच नका, कारण प्रत्येकाला आपापलेच वचन ओझे असे होईल, कारण जिवंत देव, सेनाधीश परमेश्वर, आमचा देव याची वचने तुम्ही विपरीत केली आहेत.

“ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरूशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.”

आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव कायम होते, जे मी पाहिले होते.

तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहूदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे. ते कमी आहे का? म्हणून त्यांची भूमी अहिंसेने भरुन गेली आहे, त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथवीले आहे, त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरुन ठेवल्या आहे.

इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, इस्राएल व एफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार, आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल.

ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.

¶ परमेश्वर म्हणतो, “तुमचे शब्द माझ्याविरूद्ध कठोर झाले आहेत. पण तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरूद्ध काय बोललो?”

आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.