क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर. देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत राज्य करतो हे त्यांना माहित होवो.
TSK
TSK · यश 52:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे, डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आम्हास न्याय देणारा आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तोच आम्हास तारील.
¶ प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.
¶ पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.
हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे; आणि तो तारण घेवून येत आहे. तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.
तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‹“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.›
¶ तो त्यांना म्हणाला, ‹“सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.›
‹आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी.›
यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,
¶ मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.