येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरून चालून गेले.
TSK
TSK · यश 63:3
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
कारण परमेश्वराचा हात यरूशलेमेला आर्शीवाद देण्यासाठी सियोन पर्वतावरून उचलला जाईल व त्याचे आर्शीवाद सदैव यरूशलेमेतील लोकांबरोबर राहतील, पण मवाब गवताप्रमाणे पायाखाली तुडवील जाईल व फेकल्या जाईल.
माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.
म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करील त्या दिवसात असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील.
ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.”
तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.