TSK

TSK · यिर्म 39:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.

तुम्ही तुमच्या शत्रूपुढे मार खाल असे परमेश्वर करील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.

मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.

तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत.

कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” पण तुम्ही इच्छुक नव्हते.

पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.”

आणि तू बाहेर हद्दपार जातांना आपल्या वस्तू दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्यांदेखत घेऊन जाशील; बाहेर हद्दपार होतांना सायंकाळी त्यांच्या नजरे देखत निघून जा.

चपळ व्यक्ती सुटणार नाही; बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही, आणि वीराला स्वत:चा जीव वाचवता येणार नाही.