TSK

TSK · शास्ते 13:20

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला,

गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले.

एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.

आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.

जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.

पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.

येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते.