TSK

TSK · विला 1:2

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात.

त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे, माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे.

माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे.

माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.

ज्या मुलांना तिने जन्म दिला त्या सर्वांपैकी तिला कोणीही मार्गदर्शन करून चालवायला नाही, आणि ज्या मुलांना तिने वाढवीले त्या सर्वांपैकी कोणी तिचा हात धरीत नाही.

आता तू उद्ध्वस्त होशील, तेव्हा काय करशील? जरी तू किरमिजी वस्त्रे घातली, आणि सोन्याच्या दागिण्याने आपल्याला सजवतेस, जरी तू काजळ घालून डोळे मोठे करतेस, पण जे मनुष्य तुझ्याकरता वासनाधीन होते आता तुझा तिरस्कार करतात. उलट, ते तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या.

“लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर. अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.

तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही. ती खूपच अधोगतीस गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझे दु:ख पाहा! कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवितो आहे ते पाहा.”

मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला. माझे याजक आणि वडील आपला जीव वाचावा म्हणून, स्वत:साठी अन्न शोधीत असता नगरात प्राण सोडले.

माझे डोळे आसवांनी जर्जर झाले आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मुले आणि तान्ही चौकांत मूर्छित पडत आहेत.

यास्तव पहा! तुझे चाहाते व द्वेष्टे सर्वांना जमा करून तुझी लाज परराष्ट्री पुढे उघडी करेल व ते तुझी नग्नता सर्व बाजूने बघतील.

ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठू शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती.

ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात.