TSK

TSK · विला 2:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

आणि ती म्हणाली, “इस्राएलापासून वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला आहे.”

¶ नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.

परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे.

हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!

तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.

“जे तुम्ही जवळून जाता, तुम्हास काहीच वाटत नाही काय? पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले, या माझ्या दु:खा सारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्ष देऊन पाहा.

कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस.

परमेश्वराने आपला क्रोध प्रकट केला. त्यांने आपला संतप्त राग ओतला आहे. त्याने सियोनेत आग लावली आहे व त्या आगित तिचे आधारस्तंभे जाळून टाकले आहेत.

यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, माझ्या संतापामुळे मी वादळ घेऊन येईन, आणि माझ्या क्रोधामुळे पुर येईल; गारा पडल्यामुळे समुळ नाश होईल.

मी तुला देवाच्या पर्वतावर एक अभिषिक्त करुब म्हणून मानवजातीच्या रक्षणासाठी ठेवले. तू अग्नीप्रमाणे धगधगणाऱ्या पाषाणांतून इकडेतिकडे चालत होतास.

मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधारमय करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही.

‹आणि तू कफर्णहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते.›

तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‹“मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले!›