परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या मनुष्यास रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या मनुष्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
TSK
TSK · लेवी 17:8
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ येथे, “जेथे इस्राएलाचे लोक उतरून आले होते तेथे एक वेदी बांधली आहे.”
परमेश्वराचा सर्व लोकसमुदाय असे म्हणतो की, तुम्ही इस्राएलाच्या देवाविरुद्ध असे पातक का केले? आज या दिवशी तुम्ही वेदी बांधून, परमेश्वराचे अनुसरण करण्याद्वारे परमेश्वराविरुद्ध बंड केले नाही काय?
मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले.
तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला, “एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण.
मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले.