TSK

TSK · लूक 12:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

होय, यरूशलेमेच्या कन्यांनो, माझा प्रियकर हाच माझा सखा आहे. त्याची वाणी सर्वांत गोड आहे. तो सर्वस्वी सुंदर आहे.

ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय? ते कळते व जे तुम्हा लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे, ते तुम्ही माझे ऐका! मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका, किंवा त्यांच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका.

यास्तव, तू स्वत:ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन.

त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.

‹जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.›

तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले.

आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे.

पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.