TSK

TSK · लूक 4:43

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील.

¶ प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‹“आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”›

‹ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.›

नासरेथच्या येशूविषयी तुम्हास माहिती आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला, जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्याच्याबरोबर होता.