TSK

TSK · लूक 5:33

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत.

जे तुम्ही खाल्ले-प्यायले ते आपल्यासाठीच होते की नाही?

¶ मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?”

¶ जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?”

‹मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र!›

‹उलट मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि माझ्या सर्व उत्त्पन्नाचा दहावा भाग देतो.’›

¶ त्यानंतर दुसर्‍या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता;

प्रभू हनन्याला म्हणाला, ‹“ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे.›