TSK

TSK · लूक 7:27

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ “पाहा! मी माझा दूत पाठवत आहे, आणि तो माझ्यापुढे मार्ग तयार करील. आणि ज्या प्रभूला तुम्ही शोधता आणि ज्याच्यात तुम्ही आनंदी होता, तो कराराचा दूत, अचानक आपल्या मंदिरात येत आहे. पाहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”

¶ ‹त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की, › ‹पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो› ‹तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.›

कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा ज्याच्या वाट सरळ करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.”