TSK

TSK · लूक 7:40

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्यापुढे बसतात तुझी वचने ऐकतात, परंतु ते ती आचरीत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते.

‹त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय?›

पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता?›

परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, ‹“ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा,”› आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला.

तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यास बोलण्यांत धरून राज्यपालाच्या आणि अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले.

‹तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.›

आता आम्हास कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपणाला गरज नाही. यावरुन आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.”