आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड.
TSK
TSK · मत्त. 5:44
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांची कत्तल केलीत. त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे.
परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
¶ ‹“परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा.›
नंतर येशू म्हणाला, ‹“हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”› त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत.
पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.