¶ म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
TSK
TSK · मीखा 2:10
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नाही.
तर असे होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हाला प्राप्त झाली तशी देव तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमी तुमच्या देवाने तुम्हाला दिली आहे, तिच्यावरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यंत तो असे करील.
पेकह इस्राएलचा राजा असताना, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करून आला. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल-बेथ-माका यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांस कैद करून अश्शूरला नेले.
तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांस मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर त्यांना मी देशामध्ये निंदेचा विषय करीन.
म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.
डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.
परमेश्वर असे म्हणतो, पाहा, यावेळी, मी देशात राहणाऱ्यांना बाहेर फेकून देईन. आणि त्यांना धडा शिकवावा म्हणून त्यांना दु:ख देईल.”
“मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्यांनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत.
¶ म्हणून देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी देवापासून मिळालेले अभिवचन अजूनही आहे आणि यास्तव तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.