TSK

TSK · गण 23:24

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”

तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.

गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.

या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्यास लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता.

सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही.

¶ त्या राजाच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल.

जसा जंगलातील प्राण्यांमधील सिंह येतो, जसा तरूण सिंह मेंढ्यांच्या कळपांत येतो, आणि तो मेंढ्यांच्या कळपातून गेला तर त्यांना तुडवितो व चिरडून टाकतो व त्यांना वाचवायला कोणी नसते, त्याच प्रकारे याकोबाचे राहीलेले लोक, पुष्कळ लोकांच्यामध्ये असतील.

¶ “त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल.

परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”