¶ मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास ठार मारू शकतो.
TSK
TSK · गण 35:12
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.
म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.
आता सगळे घर माझ्याविरूद्ध उठले आहे. सगळे मला म्हणतात, आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर. त्यास आम्ही मारून टाकतो कारण त्याने आपल्या भावाला मारले. माझा पुत्र हा आगीतल्या शेवटच्या ठिणगी सारखा आहे. त्यांनी माझ्या पुत्राचा जीव घेतला. तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील. आणि या भूमीवर नावनिशाणीही राहणार नाही.