TSK

TSK · फिलि 2:28

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परंतु त्यांनी त्यास योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्यास मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला.

मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”

ते पुन्हा त्यास कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दुःख झाले, मग ते त्यास जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.

कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;

आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.