TSK

TSK · फिलि 2:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

“कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.

परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते.

तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली.

नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, ‹“हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”›

तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले.

‹कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”›

‹परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.”›

त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.”

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.

आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.

ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”

¶ त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात.