पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते. तुझे बरोबर होते आणि आम्ही दुष्टाई केली आहे.
TSK
TSK · रोम 10:3
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही.
तू आपले डोळे वर आकाशाकडे लाव, आणि खाली पृथ्वीवर सभोवती पाहा. धुक्याप्रमाणे आकाशे नाहीसे होतील, पृथ्वी वस्राप्रमाणे जीर्ण होईल, आणि तिच्यातील राहणारे चिलटाप्रमाणे मरतील, परंतु माझे तारण अनंतकाल राहील, आणि माझी धार्मिकता तिचे काम करणे थांबवणार नाही.
परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा; कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे.
कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत, आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.
¶ सत्तर सप्तकांचा काळ तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या शहरासाठी घोषीत करण्यात आला होता; ज्यात पापाचा अंत व्हावा, अधार्मिकतेसाठी प्रायश्चित करावे, सनातन धार्मिकता उदयास यावी, दृष्टांत व स्वप्न पूर्ण व्हावे आणि पवित्रस्थानाचा अभिषेक व्हावा.
‹नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे!›
¶ आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी विश्वास धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा,
कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते कारण असा शास्त्रलेख आहे की, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे.
¶ मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे.
कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे.
¶ आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र;