TSK

TSK · 1 पेत्र 2:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.

तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा, माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका.

मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,

परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे.

कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.

आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.