TSK

TSK · 2 इति 18:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.”

¶ मग दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”

दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.

पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो:

“आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्यास आमच्यापासून परतवून लावेल.”