TSK

TSK · 2 इति 22:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

आणि रामा येथे योरामाचा राजा हा अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढत होता, तेव्हा झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी तो परत इज्रेलास गेला. आणि त्यास भेटायला यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या खाली इज्रेलला अहाबाचा मुलगा योराम ह्याला पाहायला गेला होता.

यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”

¶ यहोरामाच्या जागी यरूशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.