TSK

TSK · 2 इति 34:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”

त्याने उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट करून टाकली. तसेच स्मृतीस्तंभ, आणि अशेराचे खांबही तोडून टाकले. त्याने मोशेने केलेल्या पितळी सापाचे तुकडे केले कारण त्या दिवसांमध्ये इस्राएलाचे लोक त्यास धूप जाळत असत. ते त्यास “नहुश्तान” असे म्हणत.

मग बआलदैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्कीया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरूशलेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली व त्यांची राख बेथेल येथे नेली.

दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.

¶ राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून सुकुमार व अनुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही मनुष्यांसाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.

अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तो ही तुम्हास सोडेल.

परक्या देवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या. परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली. मंदिराच्या टेकडीवर तसेच यरूशलेमामध्ये बांधलेल्या वेद्यांही काढून यरूशलेम नगराबाहेर टाकून दिल्या.

परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले पिता मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. पित्यानी करून घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करून आमोनाने त्यांची पूजा केली.

तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.

तरुणसुध्दा आपल्या कृतीने आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.

‹तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.›