TSK

TSK · 2 इति 35:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.

हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे.

यहीएल, अजज्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिज्कीया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या मनुष्यांची निवड केली.

जे लोक त्यांच्या सभोवती राहत होते, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले.

जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरूशलेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोनेचांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे.

¶ घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली.

सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, कारण जे सर्व लोक यरूशलेमेत आहेत त्यांच्याकडे व मासेयाचा मुलगा याजक सफन्या व सर्व याजक यांच्याकडे तू आपल्या नावाने पत्रे पाठवून व म्हटले,

¶ पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.

तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील, असे त्यांना भय वाटत होते.

प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.