TSK

TSK · 2 पेत्र 1:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

‹मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.›

¶ मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.

पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.

¶ बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे;

¶ बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो.

सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या.

आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो.

जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.