TSK

TSK · प्रेषि 20:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना.

मग ते इफिस येथे आले, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले, तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.

¶ या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”

¶ तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो, तेथे आम्ही पौलाला घेणार होतो, त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे.

तेथे येशूचे काही शिष्य आम्हास आढळले आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो, पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.

मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे.