TSK

TSK · उत्प 46:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल.

तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने अधिक, आकाशातील ताऱ्यांइतके झाला आहात.

आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला.

नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.

ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले.