TSK

TSK · उत्प 5:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त स्विकारण्यास ज्या जमिनीने आपले तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे.

¶ अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले.

“कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः जशी मी शपथ घेऊन म्हणालो नोहाचा जलप्रलय पुन्हा कधीही भूमीवर चालणार नाही, तशी मी शपथ घेतली मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुला धिक्कारणार नाही.

जरी देशात नोहा, दानीएल आणि ईयोब असले प्रभू परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करु शकणार नाही पण ते त्यांच्या धार्मिकतेने स्वतःचा बचाव करतील.

शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्षद शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेखाचा,

¶ विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला.

जर त्याने पहिले जग राखले नाही पण अभक्तांच्या त्या जगावर जलप्रलय आणून, नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्यालाच केवळ इतर सात जणांसहित सुरक्षित ठेवले;